महाराष्ट्रमुंबई

Mumbai: नसीम खान यांची CWC च्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल जोरदार स्वागत.

नसीम खान यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी..

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज महाराष्ट्र पक्ष कार्यालय, टिळक भवन, दादर येथे प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, शितल म्हात्रे, ईब्राहिम भाईजान, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, रवी राजा, अशोक जाधव, अमरजीत मनहास, जेनेट डिसूजा, भावना जैन,भरत सिंह, संदेश कोंडविलकर, हुकुमराज मेहता, जीशान सय्यद, राजन भोसले, शरीफ खान, त्रिलोकी मिश्रा, अनिल चौरसिया त्यांच्यासह काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

नसीम खान यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस संघटक के सी वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथल्ला आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांचे आभार व्यक्त करीत धन्यवाद मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button