महाराष्ट्रमुंबई

Mumbai: शिवसेनेच्या जनता दरबारात लाडक्या बहीणीला मिळाला न्याय- उपनेते नांदगावकरही गहिवरल

सगळ्या समस्यावर त्यांना एकच आशेचा किरण दिसत असतो तो म्हणजे बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेबांचा कट्टर शिवसैनिक नितीन नांदगावकर . शिवसेना भवनात ते सगळ्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यांचे कधी शिवसेना स्टाईलने तर कधी प्रेमाने निराकरण करतात.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा जनता दरबार आठवड्यातील दर बुधवारी दादरच्या शिवसेनाभवनात भरत असतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते श्री नितीन नांदगावकर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अडलेल्या नडलेल्यांचे प्रश्न सोडवतात. कोणाच्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या असतात तर कोणाच्या आर्थिक . कोणाला बिल्डरांकडून फसवले गेले असते तर कोणाला कमी श्रमात अधिक पैसा कमवण्याच्या फसव्या योजनातून. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आणि अडचणी निराळ्या . या सगळ्या समस्यावर त्यांना एकच आशेचा किरण दिसत असतो तो म्हणजे बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेबांचा कट्टर शिवसैनिक नितीन नांदगावकर . शिवसेना भवनात ते सगळ्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यांचे कधी शिवसेना स्टाईलने तर कधी प्रेमाने निराकरण करतात.

या बुधवारी असाच एक भावनिक प्रसंग उपस्थितानी अनुभवला आणि नांदगावकर यांच्यासह सारेच गहिवरले. प्रसंग होता एका भगिनीवर बेतलेला. गतिमंद मुलगी पदरात पडल्यामुळे त्या भगिनीच्या पतीने तिची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता . कायदेशीर प्रक्रियेत घटस्फोट घेऊन तो वेगळा झाला . न्यायालयाने त्याला त्याच्या पत्नीला आणि मुलीला पोटगी म्हणून दरमहा रुपये २० हजार द्यावेत असा निवाडा केला आणि घटस्फोट मान्य करत त्यांना वेगळे केले . पण न्यायालयाचा निर्णय त्या भगिनीच्या पतीला मान्य झाला नाही आणि त्याने तिला दर महा पैसे देण्यास नकार दिला. त्या बहिणीने पोलीस , न्यायालय सगळीकडे दार ठोठावले पण तारखावर तारखा आणि पदरी निराशा एवढेच तिच्या हाती आले. अखेर ती आपल्या गतिमंद मुलीला घेऊन शिवसेनाभवन मध्ये नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात आली आणि न्याय द्या म्हणत रडू लागली . त्या भगिनीची अवस्था नितीनजीना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी थेट आपल्या दोन शिलेदारांना त्या बहिणीच्या पतीकडे पाठवून त्याला शिवसेनाभवन येथे बोलावले. त्याला त्याच्या गतिमंद मुलीचीही काळजी नव्हती असे त्याच्या वागण्यातून दिसत होते. न्यायलायचा निर्णय तुम्हाला बाध्य असतो हे त्याला समजावण्याचा आधी प्रयत्न केला त्यावर तो मी देणार नाही असे उर्मटपणे बोलल्यावर मात्र नितीनजीनी मग त्यांना शिवसेनेचा हिसका दाखवला . त्यांचा रुद्रावतार पाहून अखेर तो नमला आणि त्याने दरमहा त्या भगिनीला रुपये १० हजार देण्याचे मान्य केले. याच आठवड्यात त्या भगिनीला तिच्या घटस्फोटीत पतीकडून महिन्याचा पहिला हप्ता मिळाला आणि त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने जनता दरबार गाठला. नितीनजींचे आणि उद्धव ठाकरे यांचे तिने भरलेल्या डोळ्यांनी आभार मानले आणि साश्रू नयनानी आपल्या खऱ्या पाठीराख्या भावाला राखी बांधली. नितीनजीनी सगळ्यांना तिची हकीकत सांगितली आणि गहिवरल्या मनाने तिला आणि तिच्या मुलीला शुभेच्छा दिल्या तसेच काही अडचण आल्यास सांगा असा निरोप दिला. शिवसेनाभवन येथील जनता दरबार मध्ये आलेले सारेच हा प्रसंग पाहून गहिवरले. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या भावनिक रक्षाबंधनाला आणि लाडक्या बहिणीला मिळालेल्या न्यायाला पाहून सगळ्यांनी टाळ्या वाजवून नितीन नांदगावकरजीना आणि उद्धवजींना मनःपुर्वक धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button