महाराष्ट्रमुंबई

Mumbai: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन

भारतातील प्रतिष्ठित आयआयएम मुंबईचे डायरेक्टर मनोजकुमार तिवारी यांच्यावर हकालपट्टी करण्यासाठी आय.आय. एम. मुंबईच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन...

ऑगस्ट, देशभरात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी भारतीय व्यवस्थापन संस्था- मुंबई च्या डायरेक्टर पदावर असलेल्या मनोजकुमार तिवारी यांच्यावर याच संस्थेत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत केंद्रीय व्हिजिलन्स, सीएजी तसेच राष्ट्रपतींकडे तक्रार अर्ज दिले आहे.तर या बाबत न्यायालयात धाव देखील घेण्यात आली आहे. हे आरोप केले म्हणून या दोघांचे हि निलंबन करण्यात आले आहे. आयआयएम मुंबई च्या डायरेक्टर पदावर सध्या मनोजकुमार तिवारी आहेत. मात्र त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत ज्यांची भरती शिक्षक म्हणून केली त्यातील ८ जण हे आवश्यक बाबी पूर्ण न करता भरल्याचा आरोप करण्यात आले आहे. या बाबत त्यांनी भरती केलेल्या सर्वांची चौकशी ची मागणी करण्यात आली आहे.

याच बरोबर तिवारी यांनी आयआयएम चा दर्जा त्यांनी पदभार घेतल्यापासून कसा वाढविला हे खोटे भासवून देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कला बोगस माहिती पुरवली असून याची पुन्हा पडताळणी केल्यावर सहा क्रमांक आयआयएम मुंबई ला कसा बोगस पद्धतीने मिळाला याचे स्पष्टीकरण देखील मिळेल आणि यातील तिवारी यांचा सहभाग हि स्पष्ट होईल. याच बरोबर एनआयआरएफ ला आर्थिक दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष आयआयएम मुंबईचा हिशोब पत्रक तपासले तर यात साठ कोटी चा फरक दिसतो.त्यामुळे यात साठ कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.

या बाबत तक्रार करणाऱ्या महिलेला केंद्रातून डुप्यूटी सेक्रेटरी यांनी फोन करून आपण तक्रारी करत राहिलात तर आपणास सस्पेंड करण्यात येईल असे धमकावल्याचे आणि या बाबत फोन रेकॉर्डिंग हि संबंधित यंत्रणांना तक्रारदारांनी पाठविल्या आहेत. एका दलित महिला अनेक वेळा तक्रारी करून केराची टोपीली दाखवली.याच बरोबर एक व्यक्ती ला कन्सल्टन्सी फी च्या नावाने सव्वा लाख प्रति महिना देण्यात येत होते सदर व्यक्तीला हे पैसे का देण्यात येत होते याचा खुलासा हि झाल्यास मोठा भ्रष्टाचार समोर येईल अशी माहिती हि त्यांनी दिली.या बाबत त्रस्त झालेल्या महिला तक्रारदाराने सर्व संबंधित यंत्रणा, संबंधित मंत्रालय आणि अगदी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. मात्र या बाबत कोणतीही कारवाई न झाल्याने आणि आयआयएम मधून कायमस्वरूपी काढण्यात येण्याच्या भीतीने या तक्रारदारांनी हतबल झाल्याची भावना व्यक्त केली आहे. संबंधित संचालकाने अनेक प्रकारचे भ्रष्टाचार चे गंभीर आरोप आहे. संचालकांना निलंबित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. निवेदन स्वीकारासाठी चेअरमन आले पोलिसांना पुढे करून कार्यकर्त्यांना अटक करण्याचे काम केलं एका दरीत महिला अन्याय होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वस्त बसू शकत नाही. पोलिसांना पुढे करून जबरदस्तीने अटक करण्याचे काम चालू आहे. गुन्हे दाखल झाले तरी शांत बसणार नाही. तातडीने यांना बडतर्फ करावं अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी उग्र आंदोलन छेडल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष ऍड.अमोल मातेले यांनी दिला यावेळी आंदोलनात मुंबईचे उपाध्यक्ष कैलास कुषेर, सरचिटणीस इमरान तडवी, पवन काळे,सचिव हनीफ पटेल, जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे, तालुकाध्यक्ष कमलेश दांडगे एडवोकेट कुतुब आलमशाह, विजय येवले, ब्लेस डिसोजा,विशाल इंगळे, धर्मेंद्र यादव, राजेंद्र ढवळे, सज्जाद शेख, राजू तडीपली, लक्ष्मण पवार, नितेश मोरे, कुणाल इंकर, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button