Mumbai: चांदिवलीत विशाल तिरंगा गौरव यात्रा संपन्न, हजारो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली चांदिवली विधानसभा मध्ये मुंबई न्याय यात्रा कार्यक्रमांतर्गत तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, राष्ट्रपिता महात्मा गांधी चे पणतू तुषार गांधी, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्यासह चरणसिंग सप्रा व महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला.
बैल बाजार बीट चौकी पासून सुरू झालेली ही यात्रा काजूपाडा पाईपलाईन मार्गे 90 फूट रोड पासून पॅनुनसुला हॉटेल ते अंधेरी घाटकोपर लिंक रोड असल्फा मेट्रो करत परेरावाडी पाईपलाईन मार्गे खैरणी रोड नहार अमृत शक्ती मार्गे डी मार्ट समोरून म्हाडा वसाहत करीत लोक मिलन मार्गे संघर्ष नगर चांदिवली येथे समाप्त झाली.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांची प्रतिकृती, तसेच आपल्याला संरक्षण देणारे वायुसेना, जलसेना, थलसेना तसेच मुंबई पोलीसांची प्रतिकृती, तसेच स्वातंत्र्यपूर्वी वापरण्यात येणाऱ्या विंटेज आणि लहान मुलांना आकर्षित करणारे कार्टून कलाकार असा नजरेला दिपवणारा देखावा असल्यामुळेच या यात्रेत 8 ते 10 हजार स्थानिक लोकांनी मोठ्या उल्लाहासात सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, मो. गौस शेख, गणेश चव्हाण, वजीर मुल्ला, अनिल चौरसिया, शरद पवार, सुमित बारस्कर, रियाज मुल्ला यांनी तर महिलांमध्ये महिला तालुकाध्यक्ष राधिका पवार, माजी नगरसेविका सविता पवार, दमयंती ठक्कर, महिला व ब्लॉकचे सर्व अध्यक्षांनी मोठे योगदान दिले.