महाराष्ट्रमुंबई

Mumbai: अटल सेतूच्या अप्रोच रस्त्याला खड्डे प्रकरणात कंत्राटदार स्ट्रॉबॅग यास 1 कोटींचा दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटल सेतूच्या अप्रोच रस्त्याला खड्डे प्रकरणात स्ट्रॉबॅग या कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटल सेतूच्या अप्रोच रस्त्याला खड्डे प्रकरणात स्ट्रॉबॅग या कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड आकारल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाला अटल सेतूच्या खड्डयाच्या बाबतीत विविध माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात आलेल्या निरीक्षणा दरम्यानपुलाच्या रॅम्प 5 ला जोडणा-या तात्पुरत्या रस्त्याला काही छोट्या भेगा आढळून आल्या. ज्या मुख्य पुलाचा भाग नाही. हया भेगा तातडीने दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. याबाबत कंत्राटदार स्ट्रॉबॅग यांस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

22 जून 2024 रोजी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता डी एम चमलवर यांनी कंत्राटदार स्ट्रॉबॅग यास नोटीस जारी करत कळविले की 5 जानेवारी 2024 रोजी सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तरीही कामाची गुणवत्ता राखली गेली नाही. यानंतर अटल सेतूचे सल्लागार के आर शिवानंद यांनी 1 कोटींचा दंड आकारल्याची नोटीस कंत्राटदार स्ट्रॉबॅग यांस पाठविली आणि ही नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत वरील समस्या दुरुस्त करा. या व्यतिरिक्त हे दोष दुरुस्त करण्यासाठी आणि फुटपाथची गुणवत्ता आवश्यक मानकांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल याची रूपरेषा देणारा तपशीलवार कृती योजना प्रदान करा, असेही नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते एमएमआरडीए तर्फे प्रत्येक योजनेचे निरीक्षण 6 महिन्यात करण्यात यावे जेणेकरुन अश्या प्रकारे गुणवत्ता आणि ठोस कामाला डावलून करण्यात आले चुकांची दुरुस्ती तत्काळ होऊ शकते. अश्या कंत्राटदाराना दंड आकारला आहे तो योग्य आहे पण भविष्यात अश्या चुकांची पुनरावृत्ती न होण्यासाठी कंत्राटदार स्ट्रॉबॅग यास काळया यादीत टाकले जाणे तितकेच आवश्यक आहे, असे गलगली यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button