Mumbai: आस्था एकता संस्थेने आयोजित केलेल्या कांवड यात्रेचा समारोप
"दुबे इस्टेटमध्ये शिवभक्तांची एकच गर्दी"
दुबे कुटुंबीयांच्या “आस्था एकता संस्थेने” रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेल्या भव्य कांवड यात्रेत दुबे इस्टेट परिसरात सकाळपासूनच शिवभक्तांची एकच गर्दी होऊ लागली होती.
या कांवड यात्रेचे बुंदेलखंड जिल्हा जालौन येथील ओम हरीश निनावली जागीर सरकार महाराज, ह्यांनी उदघाटन केले, विशेष अतिथी मुंबई भाजपा नेते आचार्य पवन त्रिपाठी यांनी कार्यक्रमात पूजा करून, नारळ वाढवून कांवड वाटप केले . तसेच सर्व कांवडीये व भाविकांना मार्गदर्शन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली, विशेष अतिथी भाजपच्या निरिक्षक व प्रवक्त्या राणी द्विवेदी या यात्रेत उपस्थित होत्या आणि त्या कांवड घेऊन थेट शिवभक्तांसोबत चालत गेल्या. भाजपचे वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक, वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील, बोईसर विधानसभा प्रमुख विलास तरे, प्रसिध्दी प्रमुख मनोज बारोट, जिल्हा सरचिटणीस अभय कक्कर, भाजपचे ज्येष्ठ नेते नागेंद्र तिवारी, भाजप उपाध्यक्ष जयप्रकाश पांडे, इ. उपस्थित होते. सचिव शशिकांत दुबे, डिंकू सिंग, वीरेंद्र मिश्रा, पत्रकार प्रवीण पांडे आणि प्रेम चौबे, अध्यात्मिक गुरू सुबोधानंद महाराज, सचिन दुबे, अंकित तिवारी, विनीत सिंग, सम्राट शुक्ला, आशुतोष रोकडे, राजपुताना परिवाराचे अध्यक्ष ददन सिंग, पंकज पांडे, वशिष्ठ शुक्ला, अरविंद दुबे, रेशु पांडे यांचेसह अनेक मान्यवरांनी कांवड यात्रेला हजेरी लावली.
दुबे इस्टेट येथून कांवड यात्रा निघून तुंगारेश्वर महादेव मंदिरात पोहोचताना अचोळे तलावाजवळ संकल्प प्रतिष्ठान मित्र मंडळाचे आशुतोष रोकडे, अजय कदम, रोहन नकाशे, अजय धोपट, प्रसाद काळभाते, सुमित विश्वकर्मा यांनी स्वागत व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
गोखिवरे जवळील वसई फाटा येथे अल्पोपाहार व स्वागताची व्यवस्था महाराज ग्रुप के भाजपा जिल्हा सचिव सूर्यकांत मिश्रा (महाराज) ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री जयप्रकाश पांडेय, भाजपा उद्योग सेल अध्यक्ष सुरेश प्रजापति, भाजपा स्लम सेल उपाध्यक्ष अबरार अंसारी , वसई पूर्व उ.मंडल अध्यक्ष विकास सिंह ठाकुर , भाजपा कार्यकर्ता संतोष यादव, वसई पूर्व उ.मंडल सचिव अखिलानंद पाठक , उ.भा.मो उपाध्यक्ष श्रीकांत शुक्ला, उ.भा.मो उपाध्यक्ष शैलेंद्र दुबे , उ.भा.मो उपाध्यक्ष विजय भान सिंह, उ.भा.मो महामंत्री पंकज पांडेय, उ.भा.मो उपाध्यक्ष विजय सिंह , मंडल सचिव रोहित दुबे, अभिमन्यु राजभर ह्यांनी केले.
तुंगारेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर रात्रभर भजन आणि भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यासाठी कलाकारांचा महाकुंभ भरल्याचे जाणवत होते.
43 कलाकार एकही पैसे न घेता स्वेच्छेने भगवान शिवच्या दरबारात सेवा करण्यासाठी आले. ज्यामध्ये दुबे इस्टेट भजन मंडळी तर्फे हरि कीर्तन सुरु करण्यात आले त्यात आशुतोष मिश्रा, कौशल पांडे, गिरीश तिवारी, राजेश गुप्ता, दुर्गेश तिवारी, गुड्डू तिवारी, अरुप चक्रवर्ती. इत्यादी होते. याशिवाय संपूर्ण मुंबई आणि उत्तर प्रदेशातील अनेक कलाकारांनी सहभाग घेऊन एकापेक्षा एक अशी सुंदर भजने सादर केली. या भजन संगीताने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय करून झाला होता.या कलाकारांमध्ये प्रामुख्याने गायक तिवारी बंधु सुजीत तिवारी एवं मनजीत तिवारी, मुकेश त्रिपाठी, अमर रघुवंशी ,सुरेश आनंद , सुशील मिश्रा , ऋषभ तिवारी , अजय मिश्र परदेशी , राजेश यादव राज, दीपक सुहाना , रामानुज पाठक , राजू दुबे ,मनोरंजन झा, गायिका शिलू श्रीवास्तव, अंकिता पांडे, रागिनी प्रजापती,ममता उपाध्याय, नंदीनी तिवारी, गोविंद ,संतोष स्वाईं, अजित, संतोष , राहुल मिलन, कपिल मौर्य,नीरज मिश्रा,अम्बरीश मिश्रा,जमुना शर्मा, रघुराज सिंह , प्रेम सिंह, हरिओम , शिवम् इत्यादी कलाकारांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्व कलाकारांना शिवनामी देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सर्व भक्तांनी मंदिर परिसरात जलभिषेक व आरती करून यात्रा पूर्ण केली. सर्व शिवभक्तांसाठी मंदिर परिसरामध्ये संस्थाद्वारा जलपान व भंडाऱ्याची व्यवस्था केली होती
नवीन दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित दुबे यांच्या नेतृत्वाखाली विशाल दुबे, नवनीत दुबे, मानव दुबे, डॉ.अनुज दुबे व दुबे परिवारातील सर्व सदस्यांनी यात्रेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.