Uncategorized

75 किलो गाजा, शेकडो कोडीनच्या बाटल्यांसह 6 जणांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन वेगवेगळ्या प्रकरणात 75 किलो गाजा आणि 4800 कोडीनच्या बाटल्यांसह एकूण 6 आरोपींना अटक केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई

श्रीश उपाध्याय/मुंबई

75 किलो गाजा, शेकडो कोडीनच्या बाटल्यांसह 6 जणांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन वेगवेगळ्या प्रकरणात 75 किलो गाजा आणि 4800 कोडीनच्या बाटल्यांसह एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

उल्हासनगर परिसरात आंतर-राज्यीय अंमली पदार्थांचा व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने एका कुरिअर कंपनीवर करडी नजर ठेवली. कोडीनच्या ४८०० बाटल्या घेण्यासाठी आलेल्या विनोद या आरोपीला एनसीबीने अटक केली. विनोदच्या चौकशीच्या आधारे भिवंडी परिसरात छापा टाकून मनीष, आकाश, राज, मोहनीश आणि सनी या पाच आरोपींना 75 किलो गाळ्यासह पकडण्यात आले. एनसीबीने त्याच्याकडून 1,18,860 रुपये रोख देखील जप्त केले आहेत. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button