पवईच्या जयभीम नगर प्रकरणी एसआयटी चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत: नसीम खान
निष्पक्ष चौकशीसाठी एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची त्वरित बदली करावी
पवईच्या जयभीम नगर प्रकरणी एसआयटी चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत: नसीम खान
निष्पक्ष चौकशीसाठी एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची त्वरित बदली करावी
कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल
मुंबई,
६ जून रोजी मुंबई महानगरपालिका आणि पवई पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी संगनमत करून अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नियमबाह्य कारवाई करून पवईच्या जयभीम नगर मधील ६०० कुटुंबियांना बेघर केले होते. या संदर्भातील याचिकेची सुनावणी करताना अतिक्रमण काढताना जी प्रक्रिया राबवली त्याची एसआयटीमार्फत चौकशी करून पुढच्या सुनावणीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत त्या आदेशाचे स्वागत करून कोर्टाच्या आदेशामुळे या पीडित कुटुंबांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, महानगरपालिका एस वार्डचे अधिकारी, पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक बिल्डर आणि स्थानिक नेत्यांनी हातमिळवणी करून सरकारच्या संरक्षणाखाली ६०० कुटुंबाना नियमबाह्य पद्धतीने बेघर करून भर पावसाळ्यात रस्त्यावर आणले होते. या विरोधात काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. आपण स्वत: पीडित कुटुंबांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल महोदयांची भेट घेऊन पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वेधले होते.
आज हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेऊन एसआयटीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत हे स्वागतार्ह आहे. मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाकाली होणा-या या चौकशीचा अहवाल पुढच्या तारखेला कोर्टासमोर ठेवण्याचे आदेश आहेत. कोर्टाचा हा आदेश बिल्डरांच्या फायद्यासाठी गोररगीबांची घरे तोडून त्यांना रस्त्यावर आणणा-या महायुती सरकारला चपराक आहे. ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी एस वार्डचे वार्ड अधिकारी आणि महापालिका उपायुक्त तसेच पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण यांची त्वरित बदली करावी अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.