मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता, वरळी यांच्या दालनात युवकांचे ठिय्या आंदोलन…
कंत्राटदाराकडून खड्डे बुजवण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास काळे यादीत समाविष्ट करणे बाबत...... ॲड.अमोल मातेले यांची मागणी
मुंबई: मुंबईतील रस्त्यावर खड्ड्यांच साम्राज्य पाहायला मिळत आहे.पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतो. पावसाळा सुरू होताच मुंबईतील रस्त्यावर खड्डे दिसू लागतात.
या खड्ड्यामुळे अनेक अपघात होतात. तसेच वाहनांचे नुकसान होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी सुद्धा होते. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुंबई शहरातील सर्वत्र रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील नागरिकांना हालांना तर पारावार नाही. माणसे खोळंबून पडत आहेत.अपघात वाढत आहेत,वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हाडे खिळखिळी होऊन लाखो प्रवासी जायबंदी होत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार मुंबईचे युवकांचे अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले.
खड्डे बुजवण्याची कंत्राटे द्यायची ते बुजवल्याचे नाटक करायचे आणि सर्वांनी मिळून पैसे तेवढे खायचे, हजारो निष्पाप लोकांना मारून टाकणाऱ्या जायबंदी करणाऱ्या रस्ते अरजकातून आपण कधी बाहेर येणार आहोत?
हजारो कोटी रुपये खर्च रस्त्यांची अक्षरशः चाळन झाली आहे. शेकडो प्राण जातात, हजारो जखमी होतात, रुग्णालयात भरती होतात,कायमची जायबंदी होतात. जाणारा वेळ, मनस्ताप, वाढीवइंधन खर्च, आणि एकूण अर्थकारणाला लागणारा ब्रेक हा सारा मोडीत खात्याचा मेळ आहे. आता खड्डे बुजले नाहीत. तर अधिकारी आम्ही स्वतः जाऊन पाहणी करू असे म्हणतात. आज
मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता, वरळी यांच्या दालनात युवकांचे ठिय्या आंदोलन केले,जोरदार घोषणा दिल्या.
खड्डे बुजवण्यात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना कळ्या यादीत टाकावे. मुंबईतील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेविरहित आणि वाहतूक योग्य ठेवण्या कमी निष्काळजीपणा करणाऱ्या विविध कंत्राटदारांना महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्या कामे दिरंगाई करणाऱ्या कांत्राटदारांना कळ्या यादीत समाविष्ट करावे. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, सरचिटणीस मयूर केणी, इम्रान तडवी, अमोल हिरे,विशाल कनोजिया,रोहित सावंत,राजीव शर्मा, जिल्हाध्यक्ष किरण राणे, इमरान खान, तालुकाध्यक्ष प्रसाद शेंडकर नवनाथ सकपाळ,इमरान शेख, अक्षय खिल्लारी,प्रेम कुमार तायड इतर पदाधिकारी उपस्थित होते.