श्रीश उपाध्याय/मुंबई: मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलला यावर्षी 100 कोटी रुपयांची सायबर फसवणूक रोखण्यात यश आले आहे.
या वर्षी 7 महिन्यांत सायबर सेलला सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 द्वारे 35918 तक्रारी प्राप्त झाल्या. सायबर सेलच्या ५० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सायबर फसवणुकीच्या माध्यमातून करण्यात आलेला 100,84,57,854 रुपयांचा गैरव्यवहार रोखण्यात आला आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांची फसवणूक करून ही रक्कम ज्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली ती खाती सील करून सर्वसामान्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची लूट होण्यापासून रोखली गेली.
पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलिस आयुक्त अबुराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चौहान यांचे पथकाने कारवाई केली आहे.