मुंबईला हिरव्या पिलावळीच्या घशात घालण्याचा उबाठाचा डाव
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांंचा आरोप
मुंबई, दि. 1 आँगस्ट: मतांसाठी उबाठा तर्फे मुंबईला हिरव्या पिलावळीच्या घशात घालण्याचा डाव आखला जातोय. मुंबईला असुरक्षित केले जातेय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
धारावी येथे हत्या झालेल्या अरविंद वैश्य याच्या कुटुंबीयांची आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार तमिल सेलवन, मिहीर कोटेचा, महामंत्री संजय उपाध्ये, जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवडकर, मणी बालन आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुटुंबीयांना मदतही करण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, धारावीत घडलेला प्रकार हा मॉब लीचिंगचा प्रकार आहे. पोलिसांसमोर गुन्हा करू, आम्ही अंंत्य यात्रेवरही दगडफेक करू, आमचं कोण काय बिघडवणार आहे या प्रकारच्या जाहीर मानसिकेतचं प्रदर्शन धारावीमधल्या प्रकरणात दिसलं. यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेणार आहोत.
उरण मध्ये आमच्याशी यशश्री शिंदें या दलित भगिनीची हत्या झाली. आरोपी दाऊद आहे तर धारवीत अरविंद याचा खून झाला त्यातील आरोपींंची नावे अल्लू, आरिफ, सद्दाम, जुम्मन अशी आहेत. संजय राऊत यांना आमचा थेट सवाल आहे. कुठून आला हा कॉन्फिडन्स ? हा हिरव्या मतांचा कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स तुमच्यामुळे आलेला आहे आणि म्हणून या कॉन्फिडन्स ला ठेचावाच लागेल. आणि ज्या वेळेला ही भूमिका पोलीस दल आणि गृहमंत्री देवेंद्रजी घेतील या हिरव्या पिलावळीला लक्षात यायला लागलं, त्या वेळेलाच उद्धवजींचे कालचे स्टेटमेंट आहे. ते या हिरव्या पिलावळीचे आवाज झाले आहेत. काल बोलले ती काही वेगळी घटना नाही हे आम्हाला आणि तमाम हिंदू समाजाला समजते आहे. मुंबईकरांनाही समजते आहे. ज्यावेळेला हिरव्या पिलावळीचा बंदोबस्त करुन करेक्ट कार्यक्रम होईल असे वाटू लागले तेव्हा उध्दव ठाकरे म्हणाले की, एक तर मी राहिन किंवा देवेंद्र फडणवीस राहतील, असे ही आमदार आशिष शेलार म्हणाले.
संपूर्ण मुंबईला हिरवी पिलावळ असुरक्षित करु पाहतेय. म्हणून खरे युद्ध त्याच्याबरोबर आहे. मुंबई कुणाच्या घशात, विशेषतः हिरव्या पिलावळीच्या घालायची भूमिका उद्धवजी तुमची आहे, असा थेट आरोप आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
मुंबईला असुरक्षित करून हिरवा पिलावळीच्या घशात भारतीय जनता पार्टी आणि महायुती टाकू देणार नाही, असे सांगत ते पुढे म्हणाले की,
का नाही आला तिथे भेट द्यायला? का नाही संजय राऊत तुमच्या विचार परिवाराचे महाराष्ट्र विकास आघाडीची लोक धारावीत आले? असा थेट सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.