Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई

चित्रा वाघ म्हणजे इतरांचा वापर करून सापशिडीवर पुढे जाणाऱ्या नेत्या

माझ्या सुनेला भडकवून आमच्याविरोधात बोलण्याची चिथावणी दिली चित्रा वाघ यांचा कारनामा उघड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या तथा माजी आमदार विद्याताई चव्हाण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या तथा माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करत ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमांसमोर प्रसारित केली. चित्रा वाघ या इतरांचा वापर करून सापशिडीवर पुढे जाणाऱ्या नेत्या आहेत. असा हल्लाबोल विद्याताई चव्हाण यांनी केला आहे.

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला भडकवून आमच्याविरोधात बोलण्याची चिथावणी दिली. तसेच चित्रा वाघ या सुनेला मार्गदर्शन करत असल्याची ऑडिओ क्लीपही ऐकवली. मी तिचा छळ कसा केला होता हे बोलायला त्या माझ्या सुनेला सांगत होत्या. विशेष म्हणजे फडणवीसांनीच असे करायला सांगितले आहे असे चित्रा वाघ यामध्ये बोलल्या आहेत. माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात आले. या क्लिप्स माझ्याकडे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आल्या आहेत. असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, आम्ही हा ऑडिओ यासाठी ऐकवला की, चित्रा वाघ वारंवार म्हणतात की, आम्ही कुणाच्यामध्ये बोलत नाहीत. आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय. पण हा माझा अनुभव आहे की, माझ्या घरात पाच वर्षांपूर्वी झालं होतं, त्यावरुन चित्रा वाघ माझ्या सुनेला शिकवण्याचा प्रयत्न करतेय. विद्या चव्हाण तुला छळतेय, तुझ्याशी वाईट वागतेय. व्हिडीओ कसे टॅग करायचे ते चित्रा वाघ सांगत आहेत. असेही विद्याताई चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

पुढे विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, बजेटमध्ये राज्याला भरभरून दिले अशा थापा तुम्ही मारल्या. आम्ही फेक नरेटीव्ह करतो असा आरोप करता. शरद पवार साहेब पित्रुतुल्य आहेत असे सांगता, आता त्याच शरद पवार साहेबांवर टीका करतात. राज्याला ज्या पत्रकारांनी, समाजसेवकांनी दिशा दिली, त्यांचा उल्लेख पोपट असा करता. तुमच्यासारख्या खोटारड्या, बनेल, ब्लॅकमेलिंग करणारी, पक्षात मोठे पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते, हे आम्ही जवळून पाहिले आहे, असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, विशेष म्हणजे चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा बोलत आहेत. चित्रा वाघ सूनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करुन देतात, त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपण या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ या तुम्हाला मदत करतील असं विद्याताई चव्हाण यांनी सांगितलं.

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं आणि नंतर म्हणायचं की, एक वकील आम्हाला सांगतोय, हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात? माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशाप्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सूनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं, असं सुरु आहे. असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button