नराधम दाऊद शेखला फाशी द्या : ॲड. धर्मपाल मेश्राम
उरण येथील बौद्ध तरुणीच्या हत्येविरोधात आक्रमक पवित्रा : प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी
नागपूर.: नवी मुंबईतील उरण शहरातील बौद्ध समाजाच्या मुलीची निघृण हत्या करण्यात आली. दाऊद शेख नावाच्या मुस्लीम तरुणाने अत्यंत क्रुरपणे तरुणीची हत्या करून तिचे शव झाडीत फेकले. संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना आहे. दलित, बौद्धांवरील हल्ले, अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. उरण येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत याची दखल घेऊन उरण प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपी दाऊद शेखला फाशीची द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
उरण येथे बौद्ध समाजातील मुलगी यशश्री शिंदे यांच्या हत्ये प्रकरणी ॲड. मेश्राम यांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपी दाऊद शेखला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
नवी मुंबईतील उरण येथे बौद्ध तरुणी यशश्रीची छेड काढल्याप्रकरणी मूळचा कर्नाटकचा रहिवासी नराधम दाऊद शेखला पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली होती. तरुंगातून बाहेर येताच त्याने शिक्षेचा वचपा काढला. त्यात त्याने अत्यंत क्रुरपणे यशश्री शिंदेची हत्या केली. दोन्ही हात कापले, गुप्तांगावर वार केले आणि शरीराचे अक्षरश: लचके तोडले. माणुकसी हादरवून टाकणारी ही घटना बौद्ध समुदायावरील अन्यायाच्या घटनांचे जळीत वास्तव पुढे करते.
जय भीम-जय मीम चा नारा देणारे गप्प का ?
“जय भीम-जय मीम” चा नारा देणारे , त्याचा राजकीय उपयोग करणारे या घटनेवर गप्प का आहेत ? असा सवालही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
आज अशा अमानवीय घटनांचा प्रतिकार करण्यासाठी समाजबांधवांनी एक होऊन पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे. अत्याचार आणि क्रुरतेच्या घटना बौद्ध आणि आंबेडकरी समुदायासाठी नव्या नाहीत. जालना जवळील पाणशेंद्रा,अमरावती जिल्ह्यातील टेंबली, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे घडलेल्या घटना आजही ताज्या आहेत. त्यात आता उरण येथील क्रुर हत्येच्या घटनेची भर पडली. पण कुणी अशा घटनांना बळी पडले की त्यासाठी मेणबत्त्या पेटवून रस्त्यावर उतरायचे एवढेच काम समाज करतो आहे. अशा घटनांचा जोशाने प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही ॲड. मेश्राम म्हणाले.
नवी मुंबईतील उरण येथील अतिशय अमानवी व आत्यंतिक वेदना देणारी घटना ही सर्व घटनांच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या करणारी आहे. या घटनेतील आरोपी दाऊद शेख हा मानवतेसाठीच अत्यंत घातक आहे. अशा आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचे तथ्य मा. न्यायालयापुढे सरकारद्वारे सादर करण्यात यावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.