शहापूर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित करा – राजेश शर्मा
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा तलावांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे
शहापूर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित करा – राजेश शर्मा
ठाणे
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा तलावांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे.तालुक्यात जिल्ह्याच्या 40% क्षेत्रातून तानसा भातसा, वैतरणा,मध्य वैतरणा ही मोठी जलाशय आहेत तर रेल्वे, रस्ते यांची जाळे आहे.त्याचबरोबर समृद्धी महामार्ग यामुळे हा तालुका खूपच महत्त्वाचा तालुका झाला आहे परंतु येथे ग्रीन झोन व इकोसेन्सिटिव्ह झोन यामुळे औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजेश शर्मा यांनी एक निवेदन दिले असून निवेदनात पुढे म्हटले आहे की तालुक्यामध्ये शिवगर्भसंस्कार भूमी असलेला किल्ले माऊली सह्याद्री पर्वत वाल्मीक ऋषींची समाधी,विविध धार्मिक स्थळे त्याचबरोबर लहान मोठे डॅम आणि विशेष म्हणजे आदिवासीबहुल पठारे यावरील ट्रायबल टुरिझम या माध्यमातून शहापूर तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो तरी शहापूर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा अशी मागणी राजेश शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.