TOP NEWSUncategorizedक्राईममहाराष्ट्रमुंबई

वरळी स्पामधील खुनाच्या तीनही आरोपींना अटक

मुंबईतील वरळी परिसरात २४ जुलैच्या रात्री एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

वरळी स्पामधील खुनाच्या तीनही आरोपींना अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबईतील वरळी परिसरात २४ जुलैच्या रात्री एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

24 जुलैच्या रात्री वरळीच्या एलआर पापड रोडवर असलेल्या सॉफ्ट टच स्पामध्ये गुरु सिद्धप्पा अंबादास वाघमारे यांची काही लोकांनी हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी संतोष सोपान शेरेकर या आरोपीला अटक केली. संतोषने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले कि, गुरु त्याच्या स्पाविरोधात पोलिसांत तक्रार करून त्रास देत होता. या गोष्टीला कंटाळून संतोषने गुरूच्या हत्येचा सुपारी दिला. संतोषकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी मोहम्मद फिरोज अन्सारी आणि साकिब अन्सारी या दोन नराधमांना अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button