TOP NEWSUncategorizedक्राईममहाराष्ट्रमुंबई

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या तत्परतेमुळे चार कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्परता दाखवत चार वेगवेगळ्या प्रकरणात 150 ग्रॅम एमडी आणि 7.954 किलो चरस जप्त केला आहे.

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या तत्परतेमुळे चार कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.


श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्परता दाखवत चार वेगवेगळ्या प्रकरणात 150 ग्रॅम एमडी आणि 7.954 किलो चरस जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 4.24 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई ANC च्या आझाद मैदान युनिटने गुरुवारी शिवडी पूर्व भागात कारवाई करत 7.954 किलो चरससह एका आरोपीला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत ३.९८ कोटी रुपये आहे. आझाद मैदान युनिटने आणखी एका प्रकरणात कारवाई करत १५ ग्रॅम एमडीसह एका आरोपीला अटक केली आहे.

 

एएनसीच्या घाटकोपर युनिटने मानखुर्द पूर्व येथून एका ड्रग्ज विक्रेत्याला ९७ ग्रॅम एमडीसह अटक केली आहे.
एएनसीच्या कांदिवली युनिटने एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 38 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे.
सह पोलिस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त शाम घुगे यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button