समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15 ऑगस्टपर्यत अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15 ऑगस्टपर्यत अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा,असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
आज मंत्रालयात दिव्यांग विद्यापीठ निर्मितीसंदर्भात मंत्री उच्च व तंत्रशिक्षण श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकार, अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापण्याच्या आवश्यक सोयीसुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने सविस्तर अहवाल १५ ऑगस्ट २०२४ पर्यत राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा, हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर लवकरच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.