महाराष्ट्रमुंबई

पदपथावरील जाहिरात फलक निष्कासित करण्याची मागणी

अनिल गलगली यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई: आपण सर्व घाटकोपर पूर्व येथील एका चुकीच्या जाहिरात फलकामुळे आजही दुःखात आहोत. अश्या चुका मुंबईतील विशेषतः पदपथावर आजही प्रत्यक्षात दिसत आहे. यामुळे भविष्यात येथेही अश्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पदपथावरील जाहिरात फलक निष्कासित करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी आणि पालिका उपायुक्त किरण दिघावकर यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की मुंबईतील पालिका आणि एमएमआरडीएच्या अख्यतारीत असलेल्या पदपथावर आज 50 हून अधिक असे जाहिरात फलक ठळकपणे दिसून येत आहेत. यात मुंबई पालिका, एमएमआरडीए अश्या संस्थांनी परवानगी दिल्या आहेत. मुंबईत वातावरण बदल होत असतात आणि तासी हवेचा वेग अधिक होत असतो. अश्यावेळी हे फलक टिकाऊ नाहीत. पदपथावर नागरिकांना चालण्यासाठी असावा पण दुर्दैवाने अश्या पदपथावर मोठ मोठे जाहिरात फलक केव्हाही कोसळू शकतात.

अनिल गलगली यांची मागणी आहे की सद्यस्थितीत अग्रक्रमाने पालिका आणि एमएमआरडीएचे पदपथ जाहिरात फलक मुक्त करत निष्कासित करावे. नवीन जाहिरात धोरणात पदपथावर जाहिरात फलक लावण्याची तरतूद रद्दबातल करण्यात यावी, असे मत गलगली यांचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button