कोंकण साठी बोरिवली येथून गाड्या सोडण्यात येईल
केंद्रीय मंत्री उत्तर मुंबई खासदार पीयूष गोयल यांच्या प्रयत्नाने निर्णय! कोंकण वासियानी सत्कार करून आभार मानले
केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईतील खासदार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई उत्तम मुंबई करण्याचे वचन दिले आहे. याच पातळी वर श्री गोयल यांनी कोंकण रेलवे जागृत संघ आणि उत्तर मुंबकर यांच्या कडून कोंकण करिता बोरिवली येथून सुटणाऱ्या गाड्यांची मागणी मे 2024 मध्ये केली होती ते मान्य करत दोन गाड्या बोरिवली येथून कोंकण साठी सुटेल असे निर्णय झाले आहे. येणाऱ्या दिवसात या संदर्भात रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन विधिवत शुभारंभ करण्यात येईल.
गणेशोत्सव निमित्तानं कोकणवासीयांना आपल्या गावी साजऱ्या होणाऱ्या उत्सवात पोहोचण्यासाठी बोरिवली येथून मोफत दोन गाड्या सोडण्यात येईल अशी घोषणा ही श्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराज मुंबई येथून आणि वांद्रे येथून मात्र कोंकण गाड्या सोडण्यात येत असे पण बोरिवली येथून एक ही गाड्या कोंकण करिता नसल्याने CSMT पोहोचण्यात खूप अडचणी होत असते आणि केंद्रीय मंत्री द्वय श्री वैष्णव आणि श्री पीयूष गोयल यांच्या निर्णयाने कोकणवासीयांना आणि इतर कोकण प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी सोय होत आहे. या वर उत्तर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले लाडके नेत्यांचे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
शरद साटम, दीपक बाळा तावडे, सुरेश मापारी तसेच जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी उत्तर मुंबई जील्हाच्या बैठकीत शाल पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल यांचे धन्यवाद केले.
यावेळी बैठकीत माजी खासदार गोपाळ शेट्टी हे ही उपस्थित होते.