क्राईम
वेश्याव्यवसायात गुंतलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा 5 ने केली अटक
मुंबई क्राईम ब्रँच 5 ने कुर्ला पश्चिम येथून दोन महिला आणि एका पुरुषाला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक केली आहे. कुर्ला परिसरात काही लोक अवैध वेश्या व्यवसाय करत
मुंबई क्राईम ब्रँच 5 ने कुर्ला पश्चिम येथून दोन महिला आणि एका पुरुषाला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
कुर्ला परिसरात काही लोक अवैध वेश्या व्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 5 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला पश्चिम येथून दोन अल्पवयीन मुलींची सुटका करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे