महाराष्ट्र
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 10 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह एका आरोपीला केली अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 10 कोटी रुपयांच्या एमडीसह एका आरोपीला अटक केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 10 कोटी रुपयांच्या एमडीसह एका आरोपीला अटक केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, काही लोक बाहेरील राज्यातून एमडी ड्रग्ज आणून मुंबईत विकत असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचून सायन सर्कल येथून एम एस शेख नावाच्या व्यक्तीला ५ किलो एमडीसह पकडले. शेख हा हैदराबाद येथून ड्रग्जचा पुरवठा करत होता. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे