मुंबई

बनावट पोलीस असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक

कांदिवली परिसरात राहणारा श्याम (नाव बदलले आहे) याला काही लोकांनी पोलीस असल्याची बतावणी करून फोन केला आणि सांगितले की, श्यामने तैवानला पाठवलेल्या कुरिअरमध्ये 5 पासपोर्ट,

श्रीश उपाध्याय/मुंबई: काही जणांनी बनावट पोलीस असल्याचे दाखवून ६५ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
कांदिवली परिसरात राहणारा श्याम (नाव बदलले आहे) याला काही लोकांनी पोलीस असल्याची बतावणी करून फोन केला आणि सांगितले की, श्यामने तैवानला पाठवलेल्या कुरिअरमध्ये 5 पासपोर्ट,
4 क्रेडिट कार्ड, 200 ग्राम एमडी बेकायदेशीरपणे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांची आणि त्यांच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. पोलीस असल्याचे दाखवून त्यांनी श्यामकडून त्याच्या बँक खात्यांची माहिती घेतली आणि त्याच्या बँकेतून 65,10,000 रुपये काढले.
याप्रकरणी श्यामने कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी उत्तर प्रादेशिक सायबर सेलकडे देण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी शुभम पडावे, फरहान अक्रम शेख आणि अदनान मिर्झा या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 13,50,838 रुपये जप्त केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अबुराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार उत्तर विभाग सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.सुवर्णा शिंदेचा
पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button