वीज दरवाढ व स्मार्ट मीटर लाऊन मुंबईकरांना लुटण्याचे काम अडाणी समहू करत आहे…. नसीम खान
आज अडानीद्वारे वीज दरवाढ व स्मार्ट मीटरच्या विरोधात बांद्रा कुर्ला संकुल येथे कॉँग्रेसतर्फे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु बीकेसी पोलिसांनी मोर्चाची
मुंबई/प्रतिनिधी: आज अडानीद्वारे वीज दरवाढ व स्मार्ट मीटरच्या विरोधात बांद्रा कुर्ला संकुल येथे कॉँग्रेसतर्फे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु बीकेसी पोलिसांनी मोर्चाची अडवणूक केली आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10-15 प्रतिनिधिना अडाणी कंपनीच्या मुख्याधिका-याला भेटून ज्ञापण देण्याची परवानगी दिली. कॉँग्रेसने अडानीद्वारे केलेली वीज दरवाढ व स्मार्ट मीटर लावण्याचे काम त्वरित बंद करण्याची मागणी ज्ञापणामध्ये केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष व मा. मंत्री नसीम खान म्हणाले की, अडाणी विद्युत कंपनीने वीज बिलाच्या नावाखाली भरघोस वीज दरवाढ केलेली आहे आणि स्मार्ट मीटर लाऊन मुंबईकरांना लुटण्याचे काम अडाणी समहू करीत आहे. दरवाढीमुळे वीज बिल वेळेत न भरल्यास वेगवेगळी वाढीव दंड आकारून ताबडतोब ग्राहकांचे विद्युत पुरवठा खंडित करून अडाणी कर्मचाऱ्याद्वारे नियमबाह्य कार्यवाही करीत विद्युत मीटर काढून घेण्याच्या अनेक घटना मुंबईत सातत्याने दिसत आहेत. नसीम खान यांनी मागणी केली आहे की, ताबडतोब ही वीज दरवाढ व स्मार्ट मीटर लावण्याचे काम त्वरित थांबवावे.
यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार व मुंबई प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप, माजी आमदार मधु चव्हाण, बलदेव खोसा, भूषण पाटील, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष अमरजितसिंग मनहास, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मनपा विरोधी पक्षनेता रवी राजा यांच्यासहित जेनेट डिसूजा, शिवजी सिंह व काँग्रेसचे इतर जेष्ठ नेते उपस्थित होते.