महाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घाटकोपरमध्ये केले व्यसनमुक्ती आंदोलन

आजचे तरुण हे देशाच उद्याचं भविष्य आहे.  परंतु देशाचे भवितव्य घडवू शकणाऱ्या आजच्या तरुणांना सक्षम करण्यास केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.

मुंबई: आजचे तरुण हे देशाच उद्याचं भविष्य आहे.  परंतु देशाचे भवितव्य घडवू शकणाऱ्या आजच्या तरुणांना सक्षम करण्यास केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.  राज्यकर्त्यांच्या वरदहस्ताने ड्रग्स माफियांनी त्यांचे जाळे देशभर यशस्वीरीत्या पसरविले आहे आणि त्याच्या विळख्यात राज्यातील आणि देशातील युवावर्ग बरबाद होत आहे.  एप्रिल-२०२४ अखेर अंमली पदार्थ वितरण आणि तस्करीचे ६,७६१ गुन्हे दाखल असून ड्रग्सचे सेवन करणाऱ्या ५,७४५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.  सुमारे ४ हजार कोटींचे अंमली पदार्थ  १,०१६ ठिकाणांवरून जप्त केले गेले आहेत.  तसेच ४,८०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा माल मुंबई पोलिसांनी वर्षभरात नष्ट केला आहे त्याचबरोबर १५० कोटीहून अधिकचा एमडी-अंमली पदार्थ गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे. हे आकडे पाहता, आपले भविष्य नक्की सुरक्षित आहे का ?
राजकीय वरदहस्त असल्याने अमली पदार्थांच्या उत्पादनावर, विक्री आणि वितरणावर कारवाई करण्यास प्रशासन हतबल आहे.  याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार), मुंबई आक्रमक झाली असून नशामुक्ती अभियानास दि. ०३.०७.२०२४ रोजी नशामुक्त घाटकोपर (पश्चिम) अंतर्गत सुरुवात केली आहे.
अंमली पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीवर वेळीच पायबंद घातला नाहीतर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने  हे अभियान ठीक-ठिकाणी सुरु करण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी यावेळी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button