राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड हा काव्यगत न्याय – महेश तपासे
आज भारताच्या लोकसभा अध्यक्ष पदी श्री ओम बिर्ला व विरोधी पक्षनेते पदी श्री राहुल गांधी यांची निवड झाली.
मुंबई: आज भारताच्या लोकसभा अध्यक्ष पदी श्री ओम बिर्ला व विरोधी पक्षनेते पदी श्री राहुल गांधी यांची निवड झाली.
ज्या राहुल गांधींची खासदारकी ओम बिर्लांनी रद्द केली होती त्याच राहुल गांधींच्या सहकार्याने आता श्री ओम बिर्लांना सभागृह चालवावे लागणार आहे असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला व हीच भारतीय संविधानाची खरी ताकद आहे याची आठवण तपासे यांनी करून दिली.
राहुल गांधीच्या निवडीमुळे इडी, सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणेतील उच्चपदस्थ नियुक्तीमध्ये मोदी सरकारचा मनमानी हस्तक्षेप आता विरोधी पक्षनेते चालू देणार नाहीत व
संसदेमध्ये मांडण्यात येणारे बिल हे चर्चेविना कायद्यात रूपांतरित होणार नाही याची देखील दक्षता इंडिया आघाडी घेईल व समस्त विरोधी पक्ष संविधानाच्या रक्षणाकरिता लोकसभेमध्ये भारतीय जनतेचा आवाज म्हणून कार्यरत राहील असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.