मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री.रवींद्र कुलकर्णी यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.
*मुंबई विद्यापीठात नवीन महाविद्यालय, नवीन तुकड्याा, वाढीव विद्यार्थी देताना मोठा भ्रष्टाचार
मुंबई: विधी, बीकाॅम मॅनेजमेंट स्टडीज, अकाऊंट फायनान्स यातील तुकड्याा, वाढीव विद्यार्थी देताना भ्रष्टाचार
विद्यापीठ म्हणत आमची मान्यता नसेल तरी महाराष्ट्र शासन मान्यता देते.
नवीन महाविद्यालय, अधिकची तुकडी यासाठी संस्थाचालक देतात २५ ते ४० लाख
गेल्या 5 वर्षात मुंबई विद्यापीठातील विधी महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नवीन विधी महाविद्यालयास परवानगी देताना नियमांची पायमल्ली होत आहे. विद्यार्थीसंख्या वाढल्याने विद्यापीठाला हा डोलारा न पेलवणारा झाला आहे. परिक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. मान्यताप्राप्त शिक्षकांच्याविना परीक्षांची सर्वकामे होत आहेत.विद्यापीठ प्रशासन फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे आणि बारकाऊंसील या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहे. अंधेरी पूर्व मधील एका विधी महाविद्यालयाला तुकडी वाढवून देण्याचे आश्वासन एका महाविद्यालयाचा प्राचार्य असलेल्या सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने दिले असल्याची माहिती आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी ई-मेल द्वारे कुलगुरू श्री रविंद्र कुलकर्णी यांना पत्र पाठवले आहे.
आधीच दयनीय स्थितित असलेल्या विधी महाविद्यालयांची व तुकड्याांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची तसेच तोतया सूर्यकांत नामे प्राचार्याची पोलीसात तक्रार दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी कुलगुरू श्री रविंद्र कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात केली आहे. अन्यथा संघटनेला मोठे आंदोलन छेडावे लागेल असेही पत्रात म्हटले आहे.