आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात योग शिबिराचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवार २१ जून २०२४ रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवार २१ जून २०२४ रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. योगामुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे अनेक आजार देखील बरे होतात. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहिती व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो