भारतीय जनता युवा मोर्चाने नाना पटोले यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन केले.
नाना पटोले यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यातील वडगाव येथे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले. आजही काँग्रेसचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना तुच्छ मानतात. लोकांना गुलामासारखी वागणूक देण्याच्या मानसिकतेने ते त्रस्त आहेत.या विचारसरणीच्या निषेधार्थ आणि ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आज भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथील जांबोरी मैदानावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन निषेध व्यक्त केला.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांचा अपमान करणे ही काँग्रेसची ओळख आहे. एकीकडे आपल्या देशाचा प्रधानसेवक “कामगारांचे पाय धुतो आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतो” तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नेहरू गांधींच्या संस्कृतीची जपणूक करताना एका सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांकडून हसत पाय धुवून घेत आहेत. अशा निर्लज्ज माणसाची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे.आंदोलनादरम्यान उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या गुलाम प्रवृत्तीचा आणि जनतेला पायाखाली ठेवण्याच्या संस्कृतीचाही तीव्र शब्दात निषेध केला.