TOP NEWSमुंबई

त्र्यंबकेश्वरमधून ओम प्रतिष्ठानच्या प्रसाद शुद्धी चळवळीला प्रारंभ

मंदिरात शुद्ध आणि सात्त्विक प्रसाद वितरीत व्हावा तसेच भेसळयुक्त प्रसाद आळा बसावा, ओम प्रतिष्ठानच्या वतीने प्रसाद शुद्धी चळवळीचा शुभारंभ करण्यात आळा

मंदिरात शुद्ध आणि सात्त्विक प्रसाद वितरीत व्हावा तसेच भेसळयुक्त प्रसाद वितरणाला आळा बसावा, यासाठी ओम प्रतिष्ठानच्या वतीने प्रसाद शुद्धी चळवळीचा शुभारंभ करण्यात आला. शुक्रवार, १४ जून रोजी नाशिक येथे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि महंत आचार्य पीठाधिश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या नेतृत्त्वात या प्रसाद शुद्धी चळवळीच्या माध्यमातून ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certification) मंदिराच्या परिसरातील निवडक प्रसाद विक्रेत्यांना देण्यात आले.

प्रसाद शुद्धीकरण मोहिमेबाबत रणजित सावरकर यांना विचारले असता ते म्हणाले, “मुस्लिम समाजासाठी हिंदू देवी-देवता हे राक्षस आहेत. त्यामुळे हदीसनुसार देवी-देवतांसाठी प्रसाद बनवल्यानंतर त्यात मुस्लिम थुंकतात.

देवाला अर्पण केलेला प्रसाद अशुद्ध असेल, तर त्याचे फळ विपरीतच मिळेल. त्यामुळे अनुकूल फळासाठी देवाला वाहिलेला प्रसाद हा नेहमी शुद्ध असावा, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष आणि ओम् प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकाने असतात. त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात. त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते. अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबी वापरून बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ‘ओम प्रतिष्ठान’च्या छत्राखाली एकवटल्या आहेत.

ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ‘ओम् प्रमाणपत्र’ (OM Certificate) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना नाशिकमध्ये संघटित झाल्या आहेत. आज शुक्रवारी, १४ जूनला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील काही मिठाई विक्रेत्यांना ओम् प्रमाणपत्र वितरीत करून या चळवळीला सुरुवात झाली. रणजित सावरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना यामागची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ”त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांचे वाटप झाले, अशी बातमी ऐकली.

अमरावतीला गाईची चरबी आणि खवा वापरून पेढे तयार केले आणि त्याची १००-१०० ग्रॅमची पाकिटे बनवून मंदिरात जात होते. हे प्रकार थांबवण्यासाठी महंत अनिकेत शास्त्री यांच्याशी चर्चा करून काही उपाय करायचे ठरवले आणि या ‘ओम् प्रमाणपत्रा’च्या संकल्पनेला नाशिक क्षेत्रातील १३ प्रमुख हिंदू धार्मिक संघटनांनी समर्थन आणि आशीर्वाद दिला तसेच त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली आहेत”, अशी माहिती सावरकर यांनी दिली.

मोहीम देशभरात राबवणार ‘ओम प्रमाणपत्र’ हे प्रसाद शुद्धतेची हमी असेल. या प्रमाणपत्राची सक्ती कुठल्याही विक्रेत्यावर करण्यात आली नसून ते ऐच्छिक असेल. या ‘ओम् प्रमाणपत्र’मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून झाली. ही मोहीम राज्यात आणि नंतर देशभरातील सर्व मंदिरांमध्ये राबवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

या प्रसाद शुद्धी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे प्रतिनिधी, संत, महंत, आखाडा प्रमुख, पुरोहित संघाचे अध्यक्ष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’चे (OM Certification)त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात सामूहिक आरती करण्यात आली. मंदिरात श्री त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी घोषणा दिल्या. याप्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certification) वितरीत करण्यात आले.

त्र्यंबकनगरीत हिंदुत्वाचा हुंकार!
या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात नाशिक येथे झाली आहे. पुढे ती राज्य आणि देश पातळीवर विस्तारली जाणार आहे, असे ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले. यावेळी नाशिक परिसरातील समस्त संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट, महंत गिरिजानंद महाराज, महंत शंकरानंद महाराज, महंत संतोकदास महाराज, महंत रामरामेश्वर महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत राहुलेश्वर महाराज, महंत प्रेमपुरी महाराज, पंडित सतीश शुक्ल, पंडित भालचंद्र शौचे, पंडित तपनशास्त्री शुक्ल, पंडित पुरुषोत्तम लोहगांवकर, पंडित रुद्र लोहगांवकर, पंडित मयुरेश दीक्षित, पंडित सत्यप्रिय शुक्ल, पंडित कळमकर गुरुजी, पंडित मनोज थेटे, पंडित नागेशशास्त्री देशपांडे, पंडित दिपेशशास्त्री देशपांडे, पंडित राहुलशास्त्री देशपांडे, डाॅ.व्यंकटेश जोशी, पंडित संकेत टोके, रामसिंग बावरी, गजुभाऊ घोडके, एड. प्रविण साळवे, प्रशांत गडाख, विष्णुभाऊ, श्रीमती पांडे भाभी, अतुल सुपेकर, ह.भ.प. उगलमोगले महाराज, एड. भानुदास शौचे, बंडोपंत अहिरराव, अक्षय अहिरराव, पवार सर, हर्षवर्धन बोऱ्हाडे सर, नंदकिशोर भावसार, स्वप्निल माशाळकर, नीरज कुलकर्णी, राजेंद्र नाचणे, मैथिली नाचणे, अनिरुद्ध कंठे, अपर्णा कंठे, नितीन जोशी, गणेश ठोंबरे, हिंदू जनजागृती समिती, मुंबई समनव्यक सागर चोपदार,हिंदु जनजागृती समिती, नाशिक समन्वयक, कु. राजेश्री देशपांडे, सकल हिंदू समाज नाशिक, मुख्य समन्वयक कैलास पंडित देशमुख, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, नाशिक संस्थापक अध्यक्ष, सागर देशमुख, मेजर किसन गांगुर्डे, विश्व हिंदू सेना, संस्थापक अध्यक्ष नाशिक अधिवक्ता महेंद्र शिंदे, गोराराम मंदिर, नाशिक विश्वस्त दिनेश मोठे, विघ्नहर गणेश मंदिर,नाशिक विश्वस्त रवींद्र पाटील, डॉ. सचिन बोधनी, श्रीराम जोशी आदींचा सहभाग होता.

काय आहे ‘ओम प्रमाणपत्र’? प्रसाद शुद्धी चळवळीअंतर्गत ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certification) बनवण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात क्यु आर कोड देण्यात आला आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर संबंधित मिठाई विक्रेत्याचा सर्व तपशील समोर येतो. त्यामुळे या प्रमाणपत्राचा कुणी दुरुपयोग करू शकणार नाही. आपण प्रसाद कुणाकडून खरेदी करत आहोत, याची माहिती या प्रमाणपत्रावरून आपल्याला सहज मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button