मुंबई

बीजेवायएमचे ४०० कार्यकर्ते दहा हजार पदवीधर मतदारांशी संपर्क साधतील.

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई तर्फे मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई: भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची पूर्व तयारी व प्रचारासाठी आज भाजप कार्यालय, वसंत स्मृती, दादर पूर्व येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चर्चा होऊन मुंबई पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण शेलार प्रचंड मतांनी विजयी व्हावेत यासाठी नियोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण विशेष सभेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजप उमेदवार किरण शेलार, बीजेवायएम मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीत बीजेवायएम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचा उत्साहाने संकल्प केला.

यावेळी संबोधित करताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, “ही निवडणूक महायुतीचे दमदार उमेदवार किरण शेलार यांच्यासारखा तरुण पत्रकार आणि त्यांच्या विरोधात अनिल परब यांच्यासारखा भ्रष्ट व्यक्ती यांच्यात आहे. आपण आपल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडावी लागेल.” बीजेवायएम मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, “युवा मोर्चाचे कार्यकर्ते या निवडणुकीत जोमाने काम करतील. त्यासाठी भाजपने 400 कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. हे कार्यकर्ते प्रत्येकी 25 मतदारांसोबत घरोघरी भेट देतील. संपर्क करून आवाहन करतील. आमच्या उमेदवाराला मतदान करा अशा प्रकारे भाजपचे मुंबईचे कार्यकर्ते 10 हजार मतदारांशी संपर्क साधतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button