कस्टमने मुंबई विमानतळावरून सहा करोड़चे सोने जप्त केले.
सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या 14 जणांना तपासुन 15 वेगवेगळ्या तस्करीचा गुन्ह्याखाली त्यांच्याकडून 10.50 किलो सोने जप्त केले आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई: सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या 14 जणांना तपासुन 15 वेगवेगळ्या तस्करीचा गुन्ह्याखाली त्यांच्याकडून 10.50 किलो सोने जप्त केले आहे.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची एकूण किंमत 6.64 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीमाशुल्क विभागाने जेद्दाहून मुंबईत येणाऱ्या चार जणांची आणि दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करून त्यांच्याकडून 5800 ग्रॅम सोन्याची धूळ जप्त केली आहे.
अन्य एका प्रकरणात, आदिस अबाबा आणि नैरोबी येथून येणाऱ्या प्रत्येकी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 1363 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
हे प्रवासी बुरख्याच्या खिशात सोने लपवून तस्करी करत होते.
दुबईहून बँकॉक, कोलंबो आणि शारजाह येथून मुंबईकडे येणाऱ्या पांच प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून १७८५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. बॅगेच्या चाकात लपवून हे प्रवासी सोने तस्करी करत होते. याशिवाय प्रवाशांना विमानात घेऊन जाणाऱ्या बसच्या सीटमध्ये लपवून ठेवलेले 1550 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे.