नागपूर

‘ब्रेक द नॅरेटिव्ह’ अहवालाचे प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते विमोचन

संविधान बदलणार हया अपप्रचारा विरोधातील मोहिमेचा अहवाल

नागपूर. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून संविधानविरोधी नॅरेटिव्ह सेटिंगचे राजकारण करण्यात आले. या दिशाभुल करणाऱ्या राजकारणाच्या प्रत्युत्तरात भारतीय जनता पार्टीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या मोहिमेचा अहवाल प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचेद्वारे ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’ नावाने प्रसिद्ध करण्यात आला. या अहलावाचे विमोचन प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते आज शुक्रवार १४ जून रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्य मार्गदर्शना नंतर झालेल्या हया कार्यक्रम प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोदजी तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. शिवप्रकाशजी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूषजी गोयल, मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. आशिष शेलार , राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्य व्यवसाय मंत्री श्री. सुधीरजी मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीद्वारे जनतेपुढे अनेक विकासाचे मुद्दे पुढे ठेवण्यात आले. यासोबतच ‘अब की बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार’ हा नारा देण्यात आला. मात्र विरोधकांकडून याबाबत अपप्रचार करीत संविधान बदलविण्यासाठी ‘४०० पार’चा नारा देण्यात येत असल्याचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करण्यात आली. विरोधकांच्या या नॅरेटिव्ह सेटिंगविरोधात राज्यात नॅरेटिव्ह तोडण्याची मोहिम राबविण्यात आली. यात प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माजी मंत्री श्री. दिलीपजी कांबळे, माजी मंत्री श्री. राजकुमारजी बडोले, माजी आमदार श्री. सुधीरजी पारवे, माजी खासदार श्री. अमरजी साबळे, माजी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मिलींदजी माने, सुभाष पारधी, संदीप जाधव, शरद कांबळे , राहुल कांबळे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकसभा क्षेत्रात मोहिम चालविली. राज्यातील १५ लोकसभा मतदार संघातील ९० पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रात प्रवास करून तिथे १३ पेक्षा अधिक पत्रकार परिषद घेतल्या व काँग्रेसच्या संविधानाबाबतच्या नॅरेटिव्ह सेटिंगचा बुरखा फाडण्यात आला. याशिवाय ४० हजार समाजजागृती पत्रक वाटून संविधानाबाबत सुरू असलेल्या अपप्रचारातील वास्तव पुढे ठेवले. आंबेडकरी चळवळीतील विविध ठिकाणच्या व्यक्तींशी भेट घेउन त्यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला. या संपूर्ण काळातील कार्य आणि यात सहभागी व्यक्तींना दिलेल्या जबाबदा-या या सर्वांचा अहवाल ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’च्या रुपात जनतेपुढे सादर करण्यात आलेला आहे.

या अहवालाच्या विमोचन प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजयजी भेंडे, मुख्यालय संघटन मंत्री श्री. रवीजी अनासपुरे, प्रदेश सहकार्यालय मंत्री श्री. संजयजी फांजे, नागपूर शहराध्यक्ष श्री. जितेंद्रजी (बंटी) कुकडे, आर्थिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक श्री. मिलींदजी कानडे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अशोकराव मेंढे , राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दीकी , प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील, प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक, प्रदेश महामंत्री श्री. संजयजी केनेकर, प्रदेश महामंत्री श्री. विजयजी चौधरी, मुख्य प्रवक्ते, श्री. केशवजी उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते श्री. विश्वासजी पाठक, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष श्री. माधवजी भंडारी, प्रदेश सचिव सरिता गाखरे, नागपूर शहर महामंत्र संघटन विष्णू चांगदे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्रातील केंद्रीय पदाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button