आपल्याला सरकार बदलायचं आहे….!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
कालिना सीएसटी रोडवरील कैलास प्रभात सोसायटीमध्ये बिल्डर- महापालिकेच्या मनमानीविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे भाजप, उत्तर मध्य मुंबई, (उत्तर भारतीय सेल) जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्याय यांना त्यांच्या समर्थकांसह पोलिसांनी अटक केली.
अनिल उपाध्याय म्हणाले कि, “सांताक्रूझ (पूर्व), सीएसटी रोडवर असलेल्या कैलास प्रभात सोसायटीला महापालिकेने सी-१ गटात टाकले आहे. या बहाण्याने बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका प्रशासन स्थानिक लोकांचे फ्लॅट जबरदस्तीने रिकामे करत आहेत.
स्थानिक लोकांनी मला मदतीची विनंती केली होती. मी गॅलेक्सी बिल्डरच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी मागितली असता बिल्डरच्या संगनमताने पोलिसांनी मला आंदोलन करू दिले नाही. बुधवारी स्थानिक रहिवाशांसह आम्ही आंदोलन करणार होतो. आमचे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी बुधवारी सकाळीच मला अटक केली.”
या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचे वार्ड अध्यक्ष सुधीर उपाध्याय यांनाही अनेक स्थानिक लोकांसह अटक करण्यात आली.
याबाबत वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांना विचारले असता, परवानगी न घेता आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे सांगितले. पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.
याबाबत महापालिकेच्या एच पूर्व सहाय्यक महापालिका आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अनिल उपाध्याय यांनी केलेल्या आरोपाबाबत गॅलेक्सी बिल्डरचे अब्दुल रहीम बारगुजर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.