कॉंग्रेसच्या विजयोत्सवात अमरावतीत धुडघुस घालणाऱ्याना अटक भाजपाचा पाठपुरावा
अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी झाल्यानंतर विजय साजरा करताना अमरावती शहरात दहशत निर्माण होईल असे कृत्य करणाऱयांवर कठोर कारवाईची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली होती.
मुंबई: अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी झाल्यानंतर विजय साजरा करताना अमरावती शहरात दहशत निर्माण होईल असे कृत्य करणाऱयांवर कठोर कारवाईची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली होती. अमरावती पोलिसांनी या प्रकरणी सात लोकांना अटक केली आहे.
भाजपाचे अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष आ. प्रवीण पोटे पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपाचे शिष्टमंडळ शेकडो कार्यकर्त्यांसह काल अमरावती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांना भेटले होते. काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत लोकांच्या दुकानात पिवळी माती फेकत, अश्लील हावभाव, रस्त्यावर शिवीगाळ करत हिंदूंच्या भावना दुखावतील असे कृत्य करण्यात आले होते. याविषयी काल पोलीस आयुक्तांजवळ तीव्र भावना मांडण्यात आली होती.
अमरावती पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद शोएब मोहम्मद जहीर रा.गवळीपुरा, शेख उमर शेख रहीम गवळीपुरा, मोहम्मद शहजाद मोहम्मद रफीक रा.लाल खडी, मोहम्मद ताज शेख हबीब रा. पावर हाऊस जवळ अवेज नगर, मेहरूखउल्ला खान तस्लिमुल्ला खान रा.नागपुरी गेट, मोहम्मद नवाज मोहम्मद आरिफ रा.सादिया नगर, शेख शाहरुख शेख मेहबूब रा.रतनगंज या सात लोकांना भादवीच्या कलम 294 IPC, सह कलम 135, 110,117 महा.पो. का. अंतर्गत अटक करण्यात आले आहे.