महाराष्ट्रमुंबई

आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरे यांनी युती सरकारवर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी “आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?” असा सवाल अँड शेलार यांनी केला आहे.

कोस्टल रोड वरुन आमदार. अँड आशिष शेलार यांना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, आदित्य ठाकरे कुठून बोलत आहेत? कुठल्या जागेवरून बोलत आहेत? ते लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?
सुट्टीवर येणाऱ्या अधिकऱ्यांसारखे काम आदित्य यांचे आहे. उंटावरून शेळ्या आदित्य यांनी हाकु नयेत. मुंबई महापालिकेला सडेतोड उत्तर द्यावे लागतील. उध्दवजी यांनी त्यावेळी ही कोस्टल रोडची कामे महापालिका कडे घेतली. उध्दवजींनी आदित्य यांच्या हट्ट मुळे हे केले. मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला.महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यांच्यावर दबाव होता का? असा थेट सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आज दादर कार्यालयात झालेल्या मुंबई भाजपा पदाधिकारी बैठकी बाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारांची पक्षाने केलेली नोंदणी मोठी आहे. नोंदणी सबमिट केली आहे, त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय सुकानु समिती मध्ये मित्र पक्षांशी बोलून घेऊ. मुंबईची जागेबाबत आता ऊबाठा सेनेचा काही प्रश्नच नाही. गेली २४ वर्ष जनसंघ आणि भाजपकडे ही जागा आहे असे ही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button