मुंबई

मराठा समाजाचा महाविकास आघाडीला संपूर्ण पाठींबा

नसीम खान यांच्याकडे सोपविले पाठिंब्याचे पत्र

आज क्षेत्रीय मराठा समाज सेवा संघ, सकल मराठा, क्रांति मोर्चाच्या पदाधिका-यांनी माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांची भेट घेतली व कॉँग्रेस सहित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा देत, पाठिंब्याचे पत्र नसीम खान यांच्याकडे सोपविले.


राज्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने झालेल्या निर्णयानुसार, देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्याच्या महाविकास आघाडीच्या लढाईत मराठा समाजानेही मोठ्या संख्येने सामील व्हावे व मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्यासहीत राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिकयाने निवडून आणावे असे आवाहन आज मराठा समाज संघटनांच्या वतीने करण्यात आले.

माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी मराठा समाजाकडून घेतलेल्या या निर्णयाबद्दल मराठा समाज, संघटना व पदाधिका-यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी व्यासदेव पवार, सुहास राणे, कृष्णा नलावडे, जगन्नाथ उदुगुडे, सुरेश भिंताडे, भिकाजी नाईकवडी, गणेश चव्हाण, अशोक पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button