डॉलरच्या बदल्यात रुपये देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार अटक
डॉलरच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखा 8 ने अटक केली आहे.
मुंबई डॉलरच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखा 8 ने अटक केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात कृष्णन नावाच्या व्यक्तीने डॉलर्सची देवाणघेवाण करण्यासाठी एका व्यक्तीला वाकोला पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले. कृष्णन याने तक्रारदाराकडून २५ हजार अमेरिकन डॉलर्स घेतले आणि बहाणा करून फरार झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी एफआयआर नोंदवला. या प्रकरणाचा तपास करून गुन्हे शाखेने त्यावेळी तीन आरोपींना अटक केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी कृष्णन उर्फ कृष्णकुमार शर्मा याला मुंबई गुन्हे शाखा 8 ने बंगळुरू येथून अटक केली आहे.
कृष्णा शर्मावर मुंबई आणि दिल्लीतही गुन्हे दाखल आहेत. कृष्णा शर्माला २३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (पी-१) विशाल ठाकूर, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 8 चे प्रभारी पुलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांचा पथकाने वरील कारवाई केली आहे.