घाटकोपर होर्डींग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार:- अनिल गलगली
घाटकोपर होर्डींग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई: घाटकोपर होर्डींग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी देते भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे.
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांनी जाहिरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. अनिल गलगली यांच्या मते 4 महाकाय होर्डींग आणि एक पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली पण त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेतली गेली नाही उलट पालिकेने मागील वर्षी या होर्डींग प्रकरणात कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठविले. मुंबईत 40 बाय 40ची होर्डींग परवानगी पालिका देते पण येथे आकार 120 बाय 120 चा होता. 7 डिसेंबर 2021 रोजी लोहमार्ग पोलिसांनी एगो मीडिया कंपनीस कंत्राट दिले होते. याप्रकरणी चौकशी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे. मुंबईत रेल्वे, एमएमआरडीए, बीपीटी, म्हाडा, एमएसआरडीसी यांनी होर्डींग लावताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून सद्यस्थितीत सर्व होर्डींगचे सुरक्षा ऑडिट केले जावे, असे गलगली यांचे मत आहे. घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत मुंबई पोलीस, पालिका , एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दल जोमाने बचाव कार्य करत आहे.