हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर
सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला. मातृशक्ती, नारीशक्ती ह्या भाजपाच्या पोकळ घोषणा, भाजपाच्या राज्यात महिला असुरक्षित.
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्याच्या मुसक्या आवळून कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती अहिर यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रगती अहिर म्हणाल्या की, प्रज्वल रेवन्ना याच्या सेक्स स्कँडलची माहिती भारतीय जनता पक्षाला होती, असे असतानाही भाजपाने जेडीएसबरोबर कर्नाटकात युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रज्वल रेवन्नाचा प्रचारही केला. रेवन्नाला मत म्हणजे मोदीला मत असे मोदी म्हणाले. हजारो महिलांवर अत्याचार करणारा प्रज्वल्ल रेवन्ना मोदीशाह यांच्या नाकाखालून परदेशात पळला कसा. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वैयक्तीक कामासाठी किंवा उपचारासाठी परदेशात गेल्याची माहिती नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी असते पण रेवन्ना पदेशात पळून गेला याची माहिती कशी मिळाली नाही.
कर्नाटकातील हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा
नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत. मागील १० वर्षांच्या भाजपा राजवटीत देशभरात लाखो महिलांवर अत्याचार झाले, भाजपा खासदार ब्रिजभूषणसिंह याने महिला खेळाडूंवर अत्याचार केले पण त्याचावरही कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर भाजपा व नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. भाजपा राजवटीत महिला सुरक्षित नाहीत, असेही प्रगती अहिर म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार भूषण पाटील, राकेश शेट्टी आदी उपस्थित होते.