” कलास्पर्श प्रतिष्ठान, नालासोपारा” द्वारा उत्स्फूर्त वक्तृत्वाचे आयोजन
डॉक्टरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टरांनीच डाॅक्टरांसाठी निर्माण केलेली संस्था "कलास्पर्श प्रतिष्ठान" द्वारा दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी "उत्स्फूर्त वक्तृत्व" या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
मुंबई: डॉक्टरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टरांनीच डाॅक्टरांसाठी निर्माण केलेली संस्था “कलास्पर्श प्रतिष्ठान” द्वारा दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी “उत्स्फूर्त वक्तृत्व” या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या उत्स्फूर्त वक्तव्यामधे डॉ.मोना त्रिवेदी,डॉ. राजेंद्र वाघ,डॉ. तेजवीरसिंह चौहान,डॉ. श्रीकांत सिंह,डॉ. तन्मय दांडेकर,डॉ. चंदाराणी बिराजदार,डॉ.रोहिणी पाटील,डॉ. कपिल पाटील,डॉ. प्राजक्ता समेळ ,डॉ. प्रतिभा राठी,डॉ. संजय मांजलकर, डॉ. सुरेश पाटील,डॉ. सूरज गायकवाड़,डॉ.अभिप्सा देशमुख,डॉ. सूरज पाठक,डॉ.
सर्वेश शर्मा या सर्वांनी आपले विचार खूप कौशल्यपूर्ण पद्धतीने सर्वांसमोर मांडले.या सर्व सहभागी वक्त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमा दिवशीच “कलास्पर्श प्रतिष्ठान”चे सल्लागार डॉ.ओमप्रकाश दुबे, डॉ. रवींद्र देशपांडे, डॉ.संजय मांजलकर डॉ.राजेंद्र वाघ, अध्यक्ष डॉ.ऋजुता दुबे, उपाध्यक्ष डॉ.जयश्री देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ सुरेश पाटील, सचिव डॉ. सुरेखा धनावडे,कोषाध्यक्ष डॉ.प्रेरणा मांजलकर,सहसचिव डॉ.
स्वाती भिंगारे,सहकोषाध्यक्ष डॉ. ज्योती राठी, सदस्य डॉ.स्मिता चव्हाण,डॉ.हेमलता शेंडे, डॉ.सुरज गायकवाड,डॉ.रेणुका पाटील,डॉ.सरिता पासी,डॉ. अस्मिता बनसोड, डॉ.उदय मस्के,डॉ.अनुज दुबे या सर्वांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसई विरार चे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपक देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते “कलास्पर्श प्रतिष्ठान”च्या लोगो चे उद्घाटन देखील करण्यात आले. ” डॉक्टरां मधील कला जोपासण्यासाठी निर्माण केलेल्या या संस्थेचे अभिनंदन व कौतुक करून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही असेच कार्यक्रम आयोजित करून संस्था अजून नावारूपाला आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत” असे त्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले.
” कलास्पर्श प्रतिष्ठान आता सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे”असे नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर आणि “कलास्पर्श प्रतिष्ठान”चे सल्लागार डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी सांगितले.
डॉ.श्रीकांत पाटील आणि डॉ.उमा पाटील यांनी खूपच उत्स्फूर्तपणे आणि उत्कृष्ट वाक् शैली मधून कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रमाला “कलास्पर्श प्रतिष्ठान” चे सल्लागार मंडळ,सर्व सदस्य नालासोपारा वसई परिसरातील बहुसंख्य डॉक्टर्स उपस्थित होते.
“कलास्पर्श प्रतिष्ठान”चे सदस्य डॉ.उदय मस्के यांनी सर्व मान्यवरांचे, उपस्थितांचे तसेच आयोजकांचे मनःपूर्वक आभार प्रकट केले.