महाराष्ट्रमुंबई

खून करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखा 7 ने 10 तासांत केली अटक .

मुंबईतील घाटकोपर परिसरात १६ वर्षीय तरुणाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ७ ने १० तासांत अटक केली आहे.

श्रीश उपाध्याय/मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरात १६ वर्षीय तरुणाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ७ ने १० तासांत अटक केली आहे.


घाटकोपर पश्चिम येथील सूर्यमुखी साईबाबा मंदिराजवळ रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका १६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखा 7 ने आरोपी हृषिकेश गुरव याला दिवा येथून अवघ्या 10 तासांत अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम , अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव,
यांच्या सूचनेनुसार


गुन्हे शाखा 7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्नील काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर व पथकाने
वरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button