महाराष्ट्रमुंबई

खासदार विनायक राऊत यांचा पराभव अटळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.

सावंतवाडी, दि. 13 एप्रिल 2024

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, आपल्या दहा वर्षाच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले. शैक्षणिक व्यवस्थेपासून ते रोजगारापर्यंत कोणतेही भरीव कार्य ते करू शकले नाहीत, त्यांचा पराभव अटळ आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

आमदार अँड आशिष शेलार आज एक दिवशीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून पदाधिकारी संवाद व गटांच्या बैठका घेतल्या नंतर त्यांनी सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, राजू राऊळ, केतन आजगांवकर, दिलीप भालेकर, अमित परब, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

अँड आशिष शेलार पुढे म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेली फुट ही त्यांच्या नेतृत्वाच्या स्वार्थ व अहंकारातून पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मते आमच्यासोबत मागितली व मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. तो शब्द न पाळता स्वार्थी हेतून स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यातूनच त्यांचा पक्ष फुटला. तर दुसरीकडे स्वतःच्या मुलीला पक्षाचे नेतृत्व देण्यातून राष्ट्रवादीची शकले झाली. यात भाजपचा काय दोष असा सवाल करतानाच मी म्हणेन तेच खरे व मी घेईन तोच निर्णय योग्य अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात अहंकारी नेते आहेत, असा आरोप आ. आशिष शेलार यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे, टोमणे मारणे याची सुरुवात ही उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनीच केली. अहंकार व अतिआत्मविश्वास यामुळेच त्यांचा व त्यांच्या पक्षाचा घात झाला. फौजा, खंजीर, बाप कोणी काढले हे सर्वज्ञात आहे.

मोदी परिवार ही या देशातील सेवकांची फौज आहे. विकसित भारताचं स्वप्न घेऊन २०४७ च्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदीजींचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी व तरुणांच्या भवितव्याच्या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत या निवडणुकीत आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आम्ही फोडाफोडीचे राजकारण करीत नसून मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लहान मोठे पक्ष विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला साथ करीत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली स्वागतार्ह

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोदी सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री आहेत. ते महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जर स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतली असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. केंद्राच्या माध्यमातून झालेला विकास व स्थानिक खासदारांचे अपयश ते प्रभावीपणे येथील जनतेपर्यंत मांडू शकतात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात कोकणात निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button