छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजप + महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईत अनेक ठिकाणी पुष्पांजली वाहिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सुशासनाचा मंत्र, राज्यकर्त्यांना दिलेले धैर्य, शौर्य आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती हेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यशैलीतून आपल्याला मिळत आहे.”
“आज आपल्याला भारत एक जागतिक महासत्ता म्हणून पहायचा आहे, आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाच्या मार्गावर भारताचा विकास होताना पहायचा आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री भाजप उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशभक्तीचे स्मरण करून अभिवादन केले.
बोरिवली आदित्य महाविद्यालयातील जय नगर स्पोर्ट्स क्लब येथे जगदीश ओझा यांच्या वतीने आयोजित सत्यनारायण महापूजा, शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित दहिसर पूर्व आनंद नगर, एनएल कॉम्प्लेक्सच्या छत्रपती शिवाजी उद्यान क्रीडांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवाचे आयोजन आमदार मनीषा चौधरी, मागाठाणेचे आमदार प्रकाश चव्हाण यांनी केले होते. केतकीपाडा येथे सुर्वे आयोजित, भाजप मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी दहिसर पूर्व एनजी पार्क येथे आयोजित केला होता.
राजे मित्र मंडळ चारकोप मध्ये श्री प्रल्हाद पै इत्यादींच्या व्याख्यानाचा कार्यक्रम चारकोप माळी नगरसेवक भाजपा अध्यक्ष बाळा तावडे संकलित
श्री पियुष गोयल आणि त्यांची पत्नी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमांना उपस्थित होते.