नागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित | मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

विजय कुमार यादव

दिल्ली, दि. 1 :

‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज 68 वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आशा पारेख यांच्या विषयी

आशा पारेख एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आहेत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. या काळात त्यांना ‘हिट गर्ल’ म्हणून संबोधले जात. चित्रपटसृष्टीत त्यांची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. अभिनेत्री म्हणून सुमारे 95 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यामध्ये कटी पतंग, मै तुलसी तेरे आंगन की, दो बदन, मेरा गाँव मेरा देश, दिल देके देखो, आये दिन बहार के, आया सावन झुमके, तिसरी मंजिल, काँरवा अशा विविध चित्रपटांचा समावेश आहे. श्रीमती पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले.

श्रीमती पारेख यांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मागील 60 वर्षांपासून सिनेक्षेत्रात काम करीत असून आजही आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगीतले.

सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार “तानाजी : द अनसंग वॉरिअर” या चित्रपटास देण्यात आला. याची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केली असून दोघांनी सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोटरु) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभूषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला होता. वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर निर्मित ‘तुलसीदास ज्युनिअर’ या चित्रपटास सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button