गुन्हे शाखेची ७ ची कार्रवाई २४५ कोटींच्या अमली पदार्थांसह ६ जणांना अटक
चोख तपास करत गुन्हे शाखा 7 ने सांगली जिल्ह्यातून 245 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह 6 आरोपींना अटक केली आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई
चोख तपास करत गुन्हे शाखा 7 ने सांगली जिल्ह्यातून 245 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह 6 आरोपींना अटक केली आहे.
गुन्हे शाखा 7 ने फेब्रुवारी महिन्यात 641 ग्रॅम एमडीसह कुर्ला परिसरातून महिला ड्रग्ज तस्कर परवीन बानो गुलाम शेख हिला अटक केली होती. चौकशीदरम्यान महिला आरोपीने सांगितले की, मीरा रोड परिसरातून तिला कोणीतरी ड्रग्ज पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मीरा रोड येथून आणखी एका आरोपी
साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस याला 6 कोटी रुपयांच्या 3 किलो एमडीसह पकडण्यात आले. गुजरातमधून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे या आरोपीने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरत येथून दोन आरोपी
इजाज अली इमदाद अली अन्सारी आणि आदिल इम्तियाज बोहरा यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या कारखान्यावर २५ एप्रिल रोजी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांना २४५.२८ कोटी रुपयांचे १२६.१४१ ग्रॅम एमडी सापडले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ६ आरोपी
प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी, लक्ष्मण बाळू शिंदे याना
अटक करण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त(प्र) दत्ता नालावडे , पुलिस उपायुक्त (प्र-1) विशाल ठाकुर यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखे 7चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे , पुलिस निरीक्षक आत्माजी सावंत एवं पथकाने वरील कारवाई केली आहे.