पोलिस आयुक्तालय आणि महापालिका मुख्यालयाजवळ पार्किंगच्या नावाखाली बेकायदा वसुली
मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरील क्रॉफेड मार्केटजवळील पार्किंग माफिया अख्तर हे वाहनांच्या पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून खुलेआम अवैध पैसे उकळत आहेत.
श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरील क्रॉफेड मार्केटजवळील पार्किंग माफिया अख्तर हे वाहनांच्या पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून खुलेआम अवैध पैसे उकळत आहेत. असा आरोप आदर्श समाज सेवा संघ संघटनेचे अफजल खान यांनी केला आहे.
त्या ठिकाणचा पार्किंगचा ठेका गेल्या वर्षीच संपल्याचे अफजल खान यांनी सांगितले. 1 जानेवारी 2024 पासून महापालिकेने या ठिकाणी कोणासही पार्किंगचे कंत्राट दिलेले नाही. या ठिकाणी सर्वसामान्यांना मोफत पार्किंग करता येते, मात्र अख्तर नावाचा पार्किंग माफिया आझाद मैदान पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन या ठिकाणी बेकायदा पार्किंग करून लाखो रुपये उकळत आहे.
खान यांनी याप्रकरणी स्थानिक आझाद मैदान पोलिस स्टेशन आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याप्रकरणी महापालिकेचा एकही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.