प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बहुजन मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये मध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, भावना घाणेकर, रविन्द्र पवार प्रदेश सरचिटनीस, प्रशांत पाटील संपर्क प्रमुख आधी उपस्थित होते.
पक्षप्रवेशादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे या पक्षाची खरी भांडवलदारीही शरद पवार साहेब आणि त्यांची कर्तबदारी आहे. शरद पवार साहेब यांचं व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. सर्वच समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा सातत्याने पवार साहेबांचा प्रयत्न असतो असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, आज अनेकजण पक्ष सोडून गेले आहे. मात्र पक्ष पवार साहेबांसोबत आहे. पवार साहेबांनी फुले ,शाहू ,आंबेडकर , बहुजनांचा आणि बहुजन वादाचा विचार क्षणासाठी दूर केला नाही. आज देशामध्ये काय चालू आहे हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे सक्षम विचाराचे लोक ज्यांचा पाया मजबूत आहे अशा लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न आमचा आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज बाळासाहेब मिसाळ पाटील, भारती बाळासाहेब मिसाळ ,रोहिदास घरत , रचना वैद्य, कैलास गायकवाड, सदानंद येवले, कल्याण दिगंबर जगदाळे ,राजेंद्र बबनराव इंगोले ,संतोष रोहिदास घरत, गणेश महादेव चौधरी, राजेंद्र नामदेव कवठेकर, शितल विठ्ठल खाडे, दत्ता महाराज दोन्हीपाटील, गणेश अनिल खराडे, मनोहर दत्तात्रय वाघ, तुषार नरेंद्र वाघ ,शेखर मगर पाटील ,सुरेश रामभाऊ डावकेर , महादेव राजमाने ,सत्यनारायण काशिनाथ बिरादार ,संदेश सुरेश घनबहादूर ,आशिष हरिश्चंद्र जाधव ,राहुल सुरेश जवळकर, मोसीनखान महमदयुसुफ खान, यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.