मीरा रोड येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वातानुकुलित होणार
मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालय अंतर्गत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वातानुकुलित होणार असून याबाबत कार्यादेश जारी करण्यात आले आहे.
मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालय अंतर्गत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वातानुकुलित होणार असून याबाबत कार्यादेश जारी करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर पालिकेने निर्णय घेतला आहे. याचशिवाय सर्व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुद्धा टप्प्याटप्याने वातानुकूलित केले जाणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसकडे विनंती केल्यानंतर त्यांनी आयुक्तांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयुक्त संजय काटकर यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आणि कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांनी कार्यादेश जारी केले आहेत.
इंदिरा गांधी रुग्णालय अंतर्गत मागच्या बाजूला पहिल्या माळयावर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. या केंद्रांचा वापर स्तुत्य असून येथे नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. सदर केंद्र वातानुकुलित होताच ज्येष्ठ नागरिकांना आराम मिळेल, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त संजय काटकर यांचे आभार मानले. इतर सर्व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुद्धा टप्प्याटप्याने वातानुकूलित केले जाणार आहे.