महाराष्ट्रमुंबई

मलबार हिल पोलिसांनी २४ तासांत हत्याऱ्याला पकडले

मलबार हिल पोलीस ठाण्यांतर्गत नोकराने केलेल्या खून व चोरीच्या गुन्ह्याची 24 तासांत उकल झाली आहे.

मुंबई: मलबार हिल पोलीस ठाण्यांतर्गत नोकराने केलेल्या खून व चोरीच्या गुन्ह्याची 24 तासांत उकल झाली आहे.
मलबार हिल येथील तानिया हाईट इमारतीतील रहिवासी
67 वर्षीय ज्योती शहा यांचा नोकर कन्हैया कुमार संजय पंडित याने 12 मार्च रोजी दुपारी गळा दाबून खून केला होता. हत्येनंतर कन्हैया तीन लाखांचे दागिने घेऊन पळून गेला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मारेकऱ्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती.
तांत्रिक सहाय्याच्या आधारे पोलिसांनी कन्हैया कुमारला भुसावळ स्थानकातून अटक केली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button