महाराष्ट्रमुंबई

मुंबई क्राईम ब्रँचने दोन कोटी रुपयांच्या चरससह एका आरोपीला केली अटक

मुंबई गुन्हे शाखा 4 ने बोरिवली परिसरातून 2.11 कोटी रुपयांच्या चरससह एका व्यक्तीला अटक केली आहे. बोरिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ कोणीतरी चरस विकणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 4 ला मिळाली होती.

मुंबई गुन्हे शाखा 4 ने बोरिवली परिसरातून 2.11 कोटी रुपयांच्या चरससह एका व्यक्तीला अटक केली आहे.
बोरिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ कोणीतरी चरस विकणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 4 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अजीज अब्दुल सिद्दीकी या आरोपीला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 7 किलो 40 ग्रॅम चरस सापडला असून त्याची किंमत 2.11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या पथकाने वरील कार्रवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button